पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासिरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न तोडले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात पाकिस्तानची थट्टा केल्याने क्रिस्टीयन बेत्झमानशी तिने साखरपूडा मोडला आहे. त्याच बरोबर त्याने पाकिस्तानचे वर्णन थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून केले आहे. या कारणामुळे झोयाने हा निर्णय घेतला आहे. देश आणि धर्मासाठी झोयाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या कारणामुळे झोया चर्चेत आली आहे.
क्रिस्टीयन हा जर्मन ब्लॉगर आहे. तो एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात पाकिस्तानविषयी वक्तव्य केलं आहे. क्रिस्टीयन म्हणाला, अशा परिस्थितीत प्रार्थना केल्यास काही फायदा होणार नाही. पॅलेस्टाइनचे समर्थन करत आवाज उचलणाऱ्या पाकिस्तानी लोकांनाही क्रिस्टीयनने प्रश्न विचारला आहे. जेव्हा आपण आपल्या स्वत: च्या देशाचा नाश करत असतो, आपला समाज आणि आपल्या लोकांना मदत करु शकत नाही तेव्हा आपण दुसऱ्यांनबद्दल वाईट वाटून घेणे थांबवा.
यानंतर झोयाने रविवारी एक पोस्ट करत तिचा निर्णय सांगितला. “क्रिस्टीयन आणि मी आता लग्न करणार नाही अशी घोषणा मी करत आहे. त्याचा माझ्या संस्कृतीकडे, माझ्या देशाबद्दल, लोकांमध्ये आणि माझ्या धर्माप्रती अचानक झालेल्या असंवेदनशील बदलामुळे मला हा कठीण आणि अटल निर्णय घेण्यास प्रवृत्त केले,” असे झोया म्हणाली.
आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा
पुढे झोया म्हणाली, “काही धार्मिक आणि सामाजिक सीमा आहेत ज्या ओलांडल्या जाऊ शकत नाहीत, म्हणूनच, आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नम्रता, सहनशीलता आणि एकमेकांबद्दल आदर हाच गुण आहे ज्याचे आपण नेहमी पालन केले पाहिजे. या भावनिक संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या अल्लाहकडे प्रार्थना करते,” अशा आशयाचे कॅप्शन देत झोयाने ती पोस्ट शेअर केली आहे.
