Ponniyin Selvan 2 box Office Collection Day 6: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: २’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाची कमाई मात्र सहाव्या दिवशी मंदावली आहे. सुरुवातीच्या चार दिवसांत चित्रपटाने १५० कोटी कमावले होते. पण पाचव्या व सहाव्या दिवशी चित्रपटाला फारसे प्रेक्षक मिळाले नसल्याचं चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Ponniyin Selvan 2 box Office Collection : ‘पोन्नियिन सेल्वन: २’ बॉक्स ऑफिसवर सुसाट, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

गेल्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता, तेव्हापासून चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण, सहाव्या दिवशी कमाईत घट नोंदवण्यात आली आहे. ‘सॅकनिल्‍क’च्‍या अहवालानुसार, ‘PS2’ ने रिलीजच्‍या सहाव्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी ८ कोटींचा बिझनेस केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी चित्रपटाने १०.५ कोटींची कमाई केली होती. यासह, ‘पोन्नियिन सेल्वन २’ ची एकूण कमाई आता १२२.२५ कोटींवर गेली आहे.

हेही वाचा – Video: पुण्यातील शो पोलिसांनी बंद पाडल्यानंतर ए. आर. रेहमान यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “आपण सर्वांनी स्टेजवर…”

हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दक्षिणेतील राज्यांमध्येही चांगली कमाई केली. यामध्ये ऐश्वर्याने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी यांची दुहेरी भूमिका साकारली होती. ‘पोन्नियिन सेल्वन २’ मध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ponniyin selvan 2 box office collection day 6 aishwarya rai ps 2 earn 8 crore hrc