Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage: सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी लग्नगाठ बांधताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकापाठोपाठ एक कलाकार लग्न करताना पाहायला मिळत आहे. आज, २४ फेब्रुवारीला महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात प्रथमेश परब लग्नबंधनात अडकला. क्षितीजा घोसाळकरसह सात फेरे घेऊन त्याने आता आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. सध्या प्रथमेशच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

प्रथमेश-क्षितीजाच्या लग्नातील एका व्हिडीओने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओतील प्रथमेश व त्याच्या बायकोच्या एका कृतीचे कौतुक केलं जात आहे. अभिनेत्याच्या लग्नातला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! अखेर प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

या व्हिडीओत, प्रथमेश व क्षितीजा एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. पण यावेळी दोघं देखील एकमेकांच्या पाया पडताना पाहायला मिळत आहेत. दोघांच्या याच कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – Video: सेल्फी घेण्यावरून चाहत्यांवर भडकले नसीरुद्दीन शाह, म्हणाले, “तुम्ही डोकं…”

दरम्यान, प्रथमेश-क्षितीजाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह ‘टाइमपास’ चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. तसेच सिद्धार्थ जाधवने देखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितीजाचा झाला होता, तेव्हापासून सगळ्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर आज दोघं लग्नबंधनात अडकले आहेत.