Priyanka Chopra had a Serious Affair Director Prahlad Kakkar Reveals : अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांशी जोडले गेले आहे, परंतु ‘डॉन’ चित्रपटानंतर तिचे वैयक्तिक आयुष्य सर्वाधिक चर्चेत आले. शाहरुख खानबरोबरच्या या चित्रपटानंतर सर्वजण प्रियांका आणि शाहरुखबद्दल बोलत होते. प्रियांकाचे बॉलीवूडमध्ये शाहरुख खानशी खूप पूर्वीपासून नाव जोडले गेले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, प्रियांका चोप्रा रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी नाव न घेता हा खुलासा केला. डॉन (२००६) आणि डॉन २ (२०११) मध्ये एकत्र काम केल्यावर शाहरुख आणि प्रियांका या दोघांची विशेष चर्चा झाली होती, त्यावेळी त्यांची जोडी खूप लोकप्रिय होती.

प्रल्हाद कक्कर काय म्हणाले?

प्रल्हाद यांनी विकी लालवानी यांना सांगितले की, “प्रियांका खूप गोड आहे आणि ती कामात एक अद्भुत व्यक्ती आहे. ती खूप महत्त्वाकांक्षी, एकाग्र मनाची आणि खूप लक्ष केंद्रित करणारी आहे. म्हणून या संपूर्ण तथाकथित प्रकरणाबद्दल ती कधीही एक शब्दही बोलली नाही. प्रत्येक जण आपापली मते मांडत होता, तिने कधीही काहीही सांगितले नाही. तिने तिचा सन्मान राखला. जर ते काही क्षुल्लक असती तर तिने नक्कीच ते हसून सोडले असते, पण प्रकरण सीरियस होते.”

प्रल्हाद म्हणाले, “तर ती तिच्यासाठी खूप वैयक्तिक बाब होती. तिला वाटत नव्हते की याबद्दल कोणी लिहावे, तिला त्याबद्दल बोलायचे नव्हते.” प्रियांका चोप्राच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल बोलताना प्रल्हाद कक्कर यांनी २००० मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये लारा दत्ताबरोबरच्या तिच्या स्पर्धेची आठवण करून दिली. ते म्हणाले, “लाराने स्पर्धा जिंकली, तर प्रियांका दुसऱ्या क्रमांकावर होती. त्या वर्षी दोघांनीही मोठी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली, पण प्रियांकाचे काही तोटे होते.”

प्रल्हाद कक्कर पुढे म्हणाले, “त्या वेळी प्रियांकाची मोठी कमतरता होती. पहिली म्हणजे ती सावळी होती. दुसरी म्हणजे तिची त्वचा खराब होती. पण, तरीही ती ते करू शकली. ‘दोस्ताना’ चित्रपटासाठी तिने खूप वजन कमी केले. दोस्तानामध्ये ती सुंदर दिसत होती. तिला गोष्टींवर खूप मेहनत घ्यावी लागली.”