करोनाची दुसरी लाट ही प्रत्येकासाठीच अडचणीची ठरलीय. या कठीण काळात एकीकडे अनेक बॉलिवूड कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत, तर दुसरीकडे अभिनेता आर माधवन याची पत्नी सरिता बिरजे ही ऑनलाईन क्सासेस घेऊन गरीब मुलांना शिकवत आहे. याचा एक व्हिडीओ पती अभिनेता आर माधवनने शेअर केलाय. या व्हिडीओची सध्या बरीच चर्चा सुरूय.

या व्हिडीओमध्ये सरिता बिरजे गरीब मुलांना ऑनलाईन धडे देताना दिसून येतेय. हा व्हिडीओ शेअर करताना पती आर माधवनने पत्नीचं कौतूक करणारी एक कॅप्शनही लिहिलंय. यात त्याने लिहिलंय, “जेव्हा पत्नी आपल्याला तिच्यापुढे खूप लहान असल्याचं भासवते…” या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, ” माझी पत्नी देशातील गरीब मुलांना शिकवतेय, हे पाहून मला स्वतःला अक्षम आणि बेकार असल्याचं वाटू लागलंय. ” हा व्हिडीओ पाहून फक्त अभिनेता आर माधवनच नाही तर सोशल मिडीयावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत सरिता बिरजे हीचं भरभरून कौतूक केलंय.

तसं अभिनेता आर माधवन याची पत्नी सरिजा बिरजेबद्दल सांगायचं झालं तर तिचा आणि बॉलिवूडच्या दुनियेचा दूर दूरचा संबंध आहे. ती या क्षेत्रातील रंग-तारकांपासून दूरच राहणं पसंत करते. अभिनेता आर माधवन सोबत ही ती क्वचितच कॅमेऱ्यासमोर येत असते. अभिनेता आर माधवन सोशल मिडीयावर बराच सक्रिय असतो आणि हल्ली तर आता काही ना काही गोष्टी तो त्याच्या फॅन्ससोबत शेअर करत असतो. काही महिन्यांपुर्वीच त्याने आपण करोना पॉझिटीव्ह असल्याचं त्याच्या फॅन्सना कळवलं होतं.