r madhvans dhokha round d corner film box office collection day is low comparatively others spg 93 | 'ब्रह्मास्त्र', 'चूपच्या' शर्यतीत माधवनचा हा चित्रपट पडला मागे; स्वस्त तिकीट असूनही प्रेक्षकांनी फिरवली पाठ | Loksatta

‘ब्रह्मास्त्र’, ‘चूपच्या’ शर्यतीत आर.माधवनचा हा चित्रपट पडला मागे; स्वस्त तिकीट असूनही प्रेक्षकांनी फिरवली पाठ

‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

‘ब्रह्मास्त्र’, ‘चूपच्या’ शर्यतीत आर.माधवनचा हा चित्रपट पडला मागे; स्वस्त तिकीट असूनही प्रेक्षकांनी फिरवली पाठ
r madhvan new film released

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले. या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार पडला आहे. आता माध्यमांच्या वृत्तानुसार ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहेत. आतापर्यंत १००८ तिकिटं विकली गेली आहेत असं बोललं जात आहे. ‘रॉकेटरी’ चित्रपटाने पुन्हा चर्चेत आला अभिनेता दिग्दर्शक आर माधवनचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘धोखा राऊंड द कॉर्नर’ या त्याच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही.

हा चित्रपट ज्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला त्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिना निमित्त तिकिटांची किंमत ७५ रुपये निश्चित करण्यात आली होती. स्वस्त दरातही हा चित्रपट पाच कोटींची कमाई करू शकला नाही. या चित्रपटाची कमाई रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि सनी देओलच्या ‘चूप’ या चित्रपटांच्या तुलनेत कमी झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२५ कोटींची कमाई केली आहे.

नातेसंबंध टिकून राहावे यासाठी बोमन इराणींनी दिला सल्ला, म्हणाले “आजचं भांडण उद्या…”

‘चीटिंग राऊंड डी कॉर्नर’ची कथा शहरी जोडप्याच्या दिवसाभोवती फिरताना दिसणार आहे. आर माधवनच्या या चित्रपटात तुम्हाला एकामागून एक असे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतील, जे प्रत्येक क्षणाला चकित करतील. कथेला योग्य असे नाव चित्रपटाला दिले आहे. एका क्षणात पती-पत्नीमध्ये प्रेम पाहायला मिळेल, तर दुसऱ्या क्षणी पत्नी पतीला गोळ्या घालण्यास सांगेल. एकूणच ही कथा सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे.

आर. माधवनच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंडींगवर असल्याचे पाहायला मिळाला होता. आर माधवन अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच मात्र आता तो उत्तम दिग्दर्शकदेखील आहे हे त्याने पटवून दिलं आहे. आर माधवन प्रमाणे त्याचा मुलगा देखील चर्चेत असतो.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाच्या रेसिपीतून तयार झालेली ‘सूप’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित बातम्या

“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
स्वप्निल जोशीने झोमॅटो अ‍ॅपबद्दल केली तक्रार, ट्वीट करत कंपनी म्हणाली “यावर उपाय…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड; प्रक्रिया न राबविता घोषणा केल्याचा आरोप
हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर
पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड