नेटफ्लिक्सवर नुकतंच रिलीज झालेल्या ‘रे’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री राधिका मदनने फिल्म इंडस्ट्रीतले अनेक गुपितं उघड केली आहेत. राधिकाने तिच्या करियअरची सुरवात टीव्ही क्षेत्रातून केली. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘मेरी आशिकी तुम से ही’ मधून डेब्यू केलं होतं. पण त्यापुढे सुरू झालेला तिचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखती दरम्यान तिने अनेक गुपितं उघड केली आहेत. राधिका ज्यावेळी ऑडिशन देण्यासाठी जात असत, त्यावेळी तिला आकर्षक शेप आणि साइजसाठी प्रयत्न करा, असे अनेक सल्ले देण्यात आले होते. इतकंच नव्हे तर तिला सर्जरी करण्यासाठी देखील सांगितलं होतं. या मुलाखतीत तिने टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंतची आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. अवघ्या १७ वर्षाची असताना तिने आपल्या अभिनयाला सुरवात केली होती. त्यावेळी तिने एका टीव्ही शोसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यात तिची निवड होऊन ती शूटिंगासाठी मुंबईत राहू लागली. त्यानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. टीव्ही क्षेत्रात मिळालेल्या यशानंतर तिने चित्रपटांसाठी ऑडिशन देणं सुरू केलं. यावेळचा अनुभव तिने या मुलाखतीत शेअर केला.

ज्यावेळी राधिकाने चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला सुरवात केली, त्यानंतर तिने अनेक ठिकाणी रिजेक्ट देखील करण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्या शेप आणि साईजला आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न कर, असे सल्ले देण्यात आले होते. त्यासाठी सर्जरी देखील तिला सांगितलं गेलं. “पण मला माझ्यावर आत्मविश्वास होता, मी खूप सुंदर आहे हे मी जाणून होते, मग मी लोकांचं का ऐकु?” असा विचार करून राधिकाने तिचे प्रयत्न सुरूच ठेवले.

त्यानंतरही गेल्या दीड वर्षापासून तिला एकही काम मिळालं नाही. त्यामुळे तिचा आत्मविश्वास थोडा डगमगला होता. अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्यानंतर अखेर एका चित्रपटासाठी तिची निवड झाली. पण यासाठी चित्रपटात तिला वयस्कर दिसायचं होतं. त्यासाठी तिला १२ किलो वजन वाढवावं लागलं.