‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना बुधवारपासूनच सुरवात झालीय. दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता दोघांच्या हळदी समारंभाचे फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. त्यांच्या हळदी समारंभातील फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. गुलाबाच्या पाकळ्या आणि हळदीचा लेप लावल्यानं राहुल-दिशाच्या चेहऱ्यावर नव्या नवरा-नवरीचं तेज दिसून आलं.
व्हायरल होत आहेत हळदी समारंभाचे व्हिडीओज
राहुल-दिशाच्या एका फॅनने या दोघांच्या हळदी समारंभातील एक बूमरॅंग व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दिशा गुलाबाच्या पाकळ्यांसोबत खेळताना दिसून आली. याशिवाय दुसऱ्या एका फोटोमध्ये दिशाला तिची गर्ल गॅंग किस करताना दिसून येत आहेत. या हळदी समारंभासाठी राहुल वैद्यने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. तर राहुलची बहिण श्रुति वैद्य हिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली होती. ‘हळदीने भावाच्या चेहऱ्यावर तेज आणखी उजळणारेय’ असं लिहित तिने सुद्धा काही फोटोज शेअर केले आहेत. श्रुति वैद्य हिने भावाच्या हळदी समारंभात जबरदस्त डान्स सुद्धा केलाय. याचा व्हिडीओ सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
या समारंभात राहुल आणि दिशा हे दोघेही हळदीने माखलेले दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायावर हळदीचा लेप लावलेला दिसून आला. बुधवारीच या दोघांच्या मेहंदीचा समारंभ पार पडला. दुल्हेराजा राहुल आपल्या मेहंदी फंक्शनमध्ये आपल्या बायकोच्या प्रेमाची जादू अर्थात वधू दिशा परमारच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी गेला होता. या दरम्यान या गोड जोडीने केवळ मीडियासाठी फोटो पोजच दिल्या नाहीत, तर राहुलने दिशासाठी एक रोमँटिक गाणेही गायले.
या दोघांच्या लग्नाला काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्या या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून यात केवळ ५० पाहूणेच सामिल होणार आहेत. त्यांच्या लग्नात अभिनेता अली गोनीसह विंदू दारा सिंह आणि मिका सिंह हे आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याची शान वाढवणार आहेत.