अभिनेता राजकुमार रावने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. हटके भूमिका साकारत राजकुमार रावने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच राजकुमार अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमधुन भेटीला येणार आहे. या टॉक शोमध्ये राजकुमार राव त्याच्या फिल्मी करिअरसोबतच अनेक खासगी गोष्टींवरदेखील मनमोकळ्या गप्पा मारताना दिसेल.
या शोमध्ये राजकुमार रावने त्याच्या खऱ्या आडनावाचा खुलासा देखील केलाय. राजकुमारचं खरं आडनाव काय होतं आणि त्याने ते का बद्दल हे त्याने या शोमध्ये शेअर केलंय. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांनी आपलं नाव बदलंल आहे. राजकुमार रावने नाव बदललं नसलं तरी त्याचं आडनाव बदलंल आहे. राजकुमारचं खरं आडनाव राव नसून यादव असं आहे. म्हणजेच त्याचं खरं नाव राजकुमार यादव असं आहे. आडनाव बदलण्यामागचं कारण राजकुमारने अरबाजच्या शोमध्ये सांगितलं आहे.
हे देखील वाचा:“हिरन डेव्हिल के पिछे डेव्हिल हिरन के पिछे… टू मच फन”, मीराबाईसोबतच्या फोटोमुळे सलमान खान ट्रोल
या शोमध्ये राजकुमार म्हणाला, “मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माझं आडनाव लावत नव्हतो. मात्र माझ्या नावामुळे खूप गोंधळ उडत होता कारण इंडस्ट्रीमध्ये आधीच काही राजकुमार होते. ज्यात राजकुमार संतोषी, राजकुमार गुप्ता, राजकुमार हिरानी. ” यावेळी राजकुमार म्हणाला की “मला अनेकदा कॉल यायचे ज्यात लोक मला असिस्ट करा म्हणायचे आणि मी गोंधळून जायतो. मी अभिनेता आहे तर असिस्ट का करू? तेव्हा माझ्या लक्षात आलं की तीन दिग्दर्शकांची नावं राजकुमार असल्याने हा गोंधळ होत आहे.”
यावेळी राजकुमारने हरियाणामध्ये आपलं आडनाव यादव असल्याचं सांगितलं. हरियाणामध्ये यादवांच्या मुलांच्या नावापुढे अनेकदा राव हे टोपण नाव दिलं जातं. त्यामुळे राजुकुमार राव हेच नाव आपल्याला आवडल्याचं राजकुमार म्हणाला.