दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि पत्नी उपासना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरच्या दिशेने निघाले आहेत. अशातच ‘आरआरआर’ फेम राम चरणचा पत्नीची सेवा करतानाचा विमानातील एक व्हिडीओ ‘एक्स’वर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणारा हा व्हिडीओ उपासनाने तिच्या ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला होता. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताना पाहून उपासनाने लगेच डीलीट केला. या व्हिडीओत उपासना पाय सोडून आराम करताना दिसत आहे; तर राम चरण खिडकीत पाहून तिचे पाय दाबताना दिसत आहे. “आमच्याबरोबर जामनगरला चला”, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

हेही वाचा… राधिका मर्चेंटने प्री-वेडिंग सोहळ्यात अमेरिकन अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीचा लूक केला रिक्रिएट; चाहते म्हणाले, “हा ड्रेस…”

शुक्रवारी हैदराबाद विमानतळावर राम चरण आणि उपासना दिसले होते. या व्हिडीओवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने कमेंट करीत लिहिले, “त्याला सर्वोत्कृष्ट पतीचा पुरस्कार द्या”; तर “कपल गोल्स”, अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली.

मेकअप आर्टिस्ट झेबा हसन हिने या दोघांचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी झेबाने उपासनाचा मेकअप केला होता. त्यात उपासनाने काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि टॉपची निवड केली होती. हा लूक परिपूर्ण करण्यासाठी मल्टीकलर हेवी ज्वेलरी तिने परिधान केली होती. काळ्या रंगाच्या मॅचिंग सूटवर राम चरणही डॅशिंग दिसत होता.

दरम्यान, राम चरणबद्दल सांगायचे झाल्यास ‘आरआरआर’ चित्रपटातून राम घराघरांत पोहोचला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावरील हूक स्टेप खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. राम आणि उपासना लहानपणापासून मित्र होते. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. १४ जून २०१२ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली आणि तब्बल ११ वर्षांनंतर २०२३ साली त्यांची मुलगी ‘क्लीन कारा कोनिडेला’ त्यांच्या आयुष्यात आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram charan massages wife upasanas feet while flying towards anant ambani radhika merchants pre wedding in jamnagar gujarat dvr