Ranjit Barot calls Chennai more professional than Mumbai : ए. आर. रहमान यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात काम केलेले ड्रमर व संगीतकार रणजित बारोट यांनी अलीकडेच हिंदी चित्रपट उद्योगाबद्दल आणि संगीतकारांचा आदर न करणाऱ्या व्यावसायिकांचे राज्य कसे आहे याबद्दल त्यांचे मत व्यक्त केल आहे.

मणिरत्नम यांच्या कल्ट चित्रपट ‘बॉम्बे’साठी ए. आर. रहमान यांच्याबरोबरच्या त्यांच्या पहिल्या सहकार्याबद्दलही त्यांनी सांगितले. ‘ओ टू इंडिया’शी बोलताना रणजित यांनी सांगितले की, ते आणि रहमान सहकारी होण्यापूर्वी मित्र होते आणि ‘बॉम्बे’मधील ‘हम्मा हम्मा’ गाण्यासाठी त्यांच्या पहिल्या सहकार्यातून केल्या गेलेल्या कामादरम्यान दोघेही तासन् तास बोलत होते.

ते म्हणाले, “रहमाननं गाणं वाजवलं आणि मला गाण्यात किती क्षमता आहे हे माहीत होतं. मग आम्ही आयुष्यावर आणि त्यानं इस्लाम धर्म कसा स्वीकारला यावर चर्चा करत राहिलो. त्यानं मला त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं. आम्ही सहकारी होण्यापूर्वी मित्र झालो आणि आजही आम्ही तसेच आहोत.” रणजित यांनी कबूल केलं की रहमान यांचा अंतर्मुखी स्वभाव असूनही ते जवळचे मित्र बनले.

रणजित यांनी सांगितले की, अनेक चित्रपट निर्माते, संगीतकार त्यांच्या कामाच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवू इच्छितात; परंतु मणिरत्नम अगदी उलट होते. त्यांनी सांगितले की, मणिरत्नम यांनी त्यांना आणि रहमानला ‘हम्मा हम्मा’ गाण्याच्या पहिल्या दिवशी फक्त बोलत असताना पकडले होते; परंतु चित्रपट निर्मात्यानं हस्तक्षेप केला नाही आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या मूडमध्ये सोडून दिले.

ते पुढे म्हणाले, “मणिरत्नमजी आले, त्यांनी पाहिले की, आम्ही पहिल्या दिवशी एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यग्र होतो आणि दुसऱ्याच दिवशी मी या गाण्यावर काम करायला सुरुवात केली.” आम्ही दोघे गप्पा मारताना पाहून मणिरत्नम नाराज झाले का, असे विचारले असता, ते म्हणाले, “मणिजींचे मन खूप मोठे आहे. त्यांना माहीत आहे की, आनंदी लोक आनंदी संगीत बनवतात. ते खूप चांगले होते. ते आम्हाला एकटे सोडून घरी गेले.”

आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांबरोबर काम केलेले रणजित यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत नसल्याचे मान्य केले. त्यांची कारणे सांगताना ते म्हणाले, “चेन्नई मुंबईपेक्षा खूपच जास्त व्यावसायिक आहे.

“चेन्नईमध्ये संगीतकारांबद्दलचा आदर खूप जास्त आहे. मुंबईतील चित्रपट उद्योग हा उद्योगपती चालवतात, ज्यांना संगीतकारांबद्दल अजिबात आदर नाही. मी लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम केले आहे. ८० च्या दशकात निर्माते खूप आदरणीय असायचे. आज निर्मात्यांना असे वाटते की, जर ते तुम्हाला पैसे देतात, तर ते तुमचे मालक आहेत. माझ्याकडे काहीच नाही.”

हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताचा कालावधी संपण्यामागे निर्मात्यांच्या वृत्तीचाही दोष रणजित यांनी दिला. ते म्हणाले, “आता संगीत फक्त चित्रपट आणि त्यातील स्टारसाठीच अर्थपूर्ण आहे. मुंबईतून येणारे कोणतंही चांगलं संगीत मला आठवत नाही. हे निर्माते आणि दिग्दर्शक संगीतकारांमध्ये हस्तक्षेप करत आहेत.” ते पुढे म्हणाले, “याचे आउटपुट एका मोठ्या पंजाबी लग्नाचे आहे. मुंबईत तेच आहे. सर्व गाणी एक मोठा डान्स नंबर आहे.”