ranveer singh and deepika padukone are going to share screen soon rnv 99 | "मी आणि दीपिका लवकरच...", रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज | Loksatta

“मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

दीपिका आणि रणवीर त्यांच्या लग्नात अडचणी आल्या आहेत आणि दोघेही वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण रणवीरने त्या दोघांबद्दल एक नवीन अपडेट दिली आहे.

“मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन; ते नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘दीपवीर’चे चाहते त्यांना एकत्र बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच दीपिका आणि रणवीर वेगळे होणार आहेत अशी बातमी आली होती. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. दीपिका आणि रणवीर त्यांच्या लग्नात अडचणी आल्या आहेत आणि दोघेही वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण रणवीरने त्या दोघांबद्दल एक नवीन अपडेट दिली आहे.

आणखी वाचा : ‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान रणवीर दीपिकाचं कौतुक करताना दिसला. त्याने आपल्या पत्नीचे केवळ कौतुकच केलं नाही तर त्याला लवकरात लवकर तिच्यासोबत चित्रपट करायचा आहे असंही सांगितलं. यावेळी रणवीरने तो लवकरच दीपिकासोबत एका चित्रपटात दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. रणवीरच्या या बोलण्यावरून त्या दोघांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा दुरावा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच फिक्की फ्रेम्स २०२२ मध्ये सहभागी झालेल्या रणवीर सिंगने आपल्या पत्नीसोबत तो लवकरच एका चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्याचे संकेत दिले आहेत आणि या बातमीने त्यांच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यासोबतच या कार्यक्रमात रणवीर सिंगने त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी दीपिका आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टी त्याने उघड केल्या.

हेही वाचा : Photos: जेव्हा उर्वशी रौतेला आणि दीपिका पदुकोण विमानप्रवासादरम्यान अचानक भेटतात…

ही जोडी शेवटची ’83’ चित्रपटात क्रिकेटर कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून लग्नानंतर त्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केलं होता. त्याआधी दोघेही ‘राम लीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ते एकत्र दिसले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ते एकत्र काम करणार असल्याच्या रणवीरने केलेल्या खुलाशातून त्याच्या चाहत्यांना त्याने एक ‘स्वीट सरप्राईज’ दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 19:01 IST
Next Story
बीफसंबंधी व्हिडीओवर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण, रणबीरची केली पाठराखण