बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. रणवीर लवकरच २००६ मध्ये प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट ‘अन्नियान’ उर्फ ‘अपरिचित’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. ‘अपरिचित’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवल्यामुळे या चित्रपटाचे निर्माते ऑस्कर रविचंद्रन यांनी दिग्दर्शक शंकर आणि निर्माते जयंतीलाल गडा यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या आधीच रविचंद्रन यांनी शंकर यांच्याविरोधात साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडे तक्रार दाखल केली आणि दावा केला की समिती लवकरच त्यांना या प्रकरणात समर्थन देणार आहे.
‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रविचंद्रन यांनी या चित्रपटाविषयी सांगितले आहे. ‘मी शंकर आणि जयंतीलाल गडा यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. ते माझ्या संमतीशिवाय चित्रपट बनवू शकत नाही, कारण माझ्याकडे चित्रपटाचा कॉपीराइट आहे आणि इतर कोणत्याही व्यक्तीकडे या चित्रपटाविषयी कोणताही अधिकार नाही, कारण या चित्रपटाचा लेखक मी आहे,’ असे रविचंद्रन म्हणाले.
दुसरीकडे रविचंद्रन यांची तक्रार पाहता दिग्दर्शक शंकर म्हणाले,” ‘अन्नियान’ ही त्यांची स्क्रिप्ट आहे आणि प्रत्येकाला त्याबद्दल माहिती आहे. ते काहीही बोलू शकतात आणि हक्क दाखवू शकतात, पण प्रत्येकाला माहित आहे की ‘अन्नियान’ हा माझा चित्रपट आहे आणि मी त्याला चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नियुक्त केले.”
आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त
रविचंद्रन हे मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, “एसआयएफसीसी, ते मला पाठिंबा देत आहेत, त्यांनी मला थोडा वेळ थांबायला सांगितले कारण त्यांनी मुंबईतील फिल्म असोसिएशनशी या विषयी चर्चा केली आहे. पण चित्रपटाचे निर्माते शंकर नसून जयंतीलाल गडा आहेत आणि ज्यांच्याशी मला या प्रोजेक्ट विषयी चर्चा करण्याची गरज आहे.’
आणखी वाचा : टायगर श्रॉफने मुंबईतील सगळ्यात महागड्या ठिकाणी घेतले घर!
‘अन्नियान’ या चित्रपटात दाक्षिणात्या सुपरस्टार विक्रमने मुख्य भूमिका साकारली आहे. २००६ मध्ये ‘अन्नियान’ चित्रपटाला हिंदीमध्ये डब करत ‘अपरिचित’ प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा रिमेक होणार या विषयी रविचंद्रन यांना सोशल मीडियावरून कळले. या विषयी सांगताना रविचंद्रन म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटले की मला कोणतीही गोष्ट न सांगता या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा करण्यात आली. आमच्या चित्रपटांमध्ये असे काही पहिल्यांदा घडले आहे.’ दरम्यान, शंकर आणि जयंतीलाल यांनी एप्रिल २०२१ मध्ये रणवीर सिंगसोबत अन्नियाचा हिंदी रिमेक बनवण्याची घोषणा केली.
