कपड्यांची हटके स्टाईल म्हणा किंवा प्रसारमाध्यमांसमोर बिनधास्तपणे प्रेयसीविषयी प्रेम व्यक्त करणे असो, अशा एक ना अनेक बेधडक कृत्यांसाठी प्रसिद्ध असणारा बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या आणखी एका कृतीने सर्वांना अचंबित केले आहे. रणवीर सिंगने शनिवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होत असताना लाईव्ह ट्विट करून पुन्हा एकदा आपल्या ‘वेडे’पणाची खात्री पटवून दिली.