बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान सध्या रोमानियामध्ये ‘जय हो’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, चित्रिकरणाच्या ठिकाणी तो लष्करी अधिकाऱ्याच्या वेशभूषेत दिसला. गुप्तहेर, पोलिस आणि अंगरक्षकाची भूमिका केल्यानंतर सलमान खान आता लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोमानियामध्ये शूटिंगच्यावेळी आपल्या एका चाहत्याबरोबर कॅमेऱ्याला पोज देताना सलमान चित्रपटाच्या सेटवर दिसला. दमदार संवाद आणि धमाकेदार अ‍ॅक्शनने भरलेला जय हो हा चित्रपट चिरंजीवीच्या स्टॅलिन चित्रपटावर आधारित आहे. तब्बू आणि डायसी शहा हा नवीन चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealed salman khan plays army officer in jai ho