ryan reynolds confirms hugh jackman to return as wolverine for deadpool 3 | Loksatta

‘डेडपूल ३’ ह्यू जॅकमन दिसणार वुल्व्हरिनच्या भूमिकेत; रायन रेनॉल्ड्सचा हा व्हिडीओ पाहिलात का?

‘डेडपूल ३’ च्या माध्यमातून डेडपूल अधिकृतरित्या एमसीयूमध्ये प्रवेश करणार आहे.

‘डेडपूल ३’ ह्यू जॅकमन दिसणार वुल्व्हरिनच्या भूमिकेत; रायन रेनॉल्ड्सचा हा व्हिडीओ पाहिलात का?
खुद्द रायन रेनॉल्ड्सने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सुपरहिरोंवर आधारित चित्रपटांचे प्रमाण वाढले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. सध्या मार्व्हल सिनेमॅटिक यूनिव्हर्स म्हणजे एमसीयूचे (MCU) चित्रपट आघाडीवर आहेत. एमसीयूचे ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ (Avengers Infinity War) आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ (Avengers Endgame) या चित्रपटांनी कलेक्शनचे अनेक विक्रम मोडले होते. याच यूनिव्हर्समधला आणखी एक लोकप्रिय सुपरहिरो म्हणजे ‘डेडपूल’ (Deadpool). मार्व्हलच्या डेडपूल या सुपरहिरोची भूमिका अभिनेता रायन रेनॉल्ड्स साकारत आहे.

डेडपूल या सुपरहिरोचे चाहते जगभरात पसरले आहेत. या काल्पनिक सुपरहिरोवर आतापर्यंत दोन चित्रपट तयार करण्यात आले आहेत. अर्वाच्च भाषा, आक्षेपार्ह आणि इंटिमेट दृश्ये अशा काही मुद्द्यामुळे डेडपूल फ्रेंन्चायझी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे फ्रेंन्चायझीमधील तिसरा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली. ‘डेडपूल ३’ च्या माध्यमातून डेडपूल अधिकृतरित्या एमसीयूमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान खुद्द रायन रेनॉल्ड्सने डेडपूलच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीच्या मृत्यूचं ६० वर्ष न उलगडलेलं रहस्य, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर जोडलं गेलं होतं नाव

रायनने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो घरातल्या सोफ्यावर बसलेला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘D23 ला येणं शक्य न झाल्याचे मला दु:ख आहे. आम्ही डेडपूलच्या आगामी चित्रपटावर खूप मेहनत घेत आहोत’ असे म्हणत डेडपूलप्रमाणे वायफळ बडबड करायला लागतो. बोलताना तो मुद्दामून गंभीर विषयावर काही ओळी बोलतो. त्यानंतर पुढच्या मिनिटाला त्याच्यामागून अभिनेता ह्यू जॅकमन जाताना दिसतो. तेव्हा रायन त्याला “तुला पुन्हा वुल्व्हरिन (Wolverine) व्हायला आवडेल का?” असा प्रश्न विचारतो. त्यावर ह्यू त्याला “होय रायन” असे उत्तर देतो.

आणखी वाचा – “तू माझं शक्ती अस्त्र…” नीतू यांची मुलगा रणबीरसाठी भावूक पोस्ट, ऋषी कपूर यांचाही खास उल्लेख

या व्हिडीओद्वारे त्यांनी ‘डेडपूल ३’ मध्ये ह्यू जॅकमन वुल्व्हरिनची भूमिका साकारणार असल्याची घोषणा केली आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोगन’ (Logan) या चित्रपटामध्ये वुल्व्हरिनच्या मृत्यूनंतर ह्यू जॅकमनने हे पात्र तो पुन्हा कधीही साकारणार नसल्याचे सांगितले होते. या व्हिडीओमुळे त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आताची वेळ चांगली, कारण…”, ऐश्वर्या रायने बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट वादावर दिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
“भारतीय चित्रपट कंपनी पायघड्या….” पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याने मनसे नेते अमेय खोपकर संतापले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: मॅव्ह..मॅव्ह..करत मांजरीने हाक मारली, कावळ्याने दिला भन्नाट प्रतिसाद, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
विश्लेषण : ‘मंदौस’ चक्रीवादळ धडकणार; जाणून घ्या, कुठे आणि काय होणार परिणाम?
“घटस्फोटासाठी लग्नानंतर एक वर्ष होणं आवश्यक नाही”, केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
Maharashtra-Karnataka Border Dispute : “गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज; अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर…” – अंबादास दानवेंचं विधान!