बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सैफिना म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत. सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सैफिनाने दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवण्याचा विचार केलाय. एवढचं काय तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील जाहीर केलेलं नाही. यानंतर मात्र आता तैमूरच्या छोट्या भावाचं नाव समोर आलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉम्बे टाइम्सच्या वृत्तानुसार सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवायचं यावर विचार करत आहेत. मात्र सध्या सैफ त्याला लाडाने ‘जेह’ (Jeh) म्हणतो. सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं हे नीकनेम म्हणजेच टोपणनाव आहे असं म्हंटलं जातंय. असं असलं तरी सैफ आणि करीनाने अद्याप त्यांच्या मुलाचं नामकरण केलेलं नाही.

हे देखील वाचा: “देशात घरकामं करणं लज्जास्पद आणि विदेशात केलं तर स्वातंत्र्य”; ‘त्या’ विधानामुळे सोनम कपूर ट्रोल

सैफ अली खानला मुलाचं ‘हे’ नाव ठेवायचं आहे.

तर रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानला त्याच्या दुसऱ्या मुलाला आपल्या वडिलांचं म्हणजे मंसूर हे नाव द्यायचं आहे. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे पटौदीने नवाब तसचं प्रसिद्ध क्रिकेटर होते.

20 डिसेंबर २०१६ साली सैफ आणि करीनाला तैमूर हा पहिला मुलगा झाला. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ म्हणतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ म्हणत असल्याचं समोर आलंय. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव कधी जाहीर करतात याची.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan and kareena kapoor younger son nickname jeh kpw