बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खानवर ‘मी टू’ चळवळीत बरेच गंभीर आरोप झाले आहेत. त्यानंतर जवळपास वर्षभरासाठी त्याला इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या साजिद खान बिग बॉस १६ मध्ये दिसत आहे. पण या शोमध्ये त्याने एंट्री केल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यातून पुन्हा एकदा त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. त्याला विरोध केला जात आहे. आता हे प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचलं आहे. अशात साजिद खानचा एक जुना व्हिडीओ आणि त्यातील वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलं आहे. ज्यात त्याने त्याच्या कॅरॅक्टरवर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर साजिद खानच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो त्याच्या भूतकाळातील नातेसंबंधांवर बोलताना दिसत आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री गौहर खानशी लग्न का मोडलं याचं कारणही सांगितलं होतं. आता यावरून त्याचीवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

आणखी वाचा- एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळली होती वैशाली ठक्कर, सुसाइड नोटमधून झाला मोठा खुलासा

किरण जुनेजा यांच्या ‘कोशिश के कामयाबी तक’ या शोमध्ये साजिद खानला गौहर खानपासून वेगळं होण्याबाबत विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना तो म्हणाला होता, “त्यावेळी माझं कॅरॅक्टर खराब होतं. मी त्यावेळी मुलींसोबत बाहेर फिरत असे आणि खूप खोटं बोलायचो. अर्थात मी कोणाशी काही गैरवर्तन केलं नव्हतं. पण मी तेव्हा प्रत्येक मुलीला आय लव्ह यू आणि माझ्याशी लग्न करशील का असं विचारत असे.”

साजिद खान पुढे म्हणाला, “जर सर्व गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे झाल्या असत्या तर कदाचित आतापर्यंत माझी ३५० लग्न झाली असती. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मी कायम लक्षात राहीन आणि याचबरोबर त्या मला शिव्याही देत असतील. कोणतंही नातं टिकून राहण्यासाठी त्याच मैत्री खूप महत्त्वाची असते. पण मी आय लव्ह यू हे वाक्य स्वार्थासाठी वापरलं.”

आणखी वाचा- घरी बोलावलं, सेक्सबाबत प्रश्न विचारला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप

दरम्यान गौहर खान जैद आणि कुशल टंडनला डेट करण्याआधी साजिद खानसह रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही लग्न करणार होते. गौहर खान फराह खानची वहिनी होणार होती पण असं होऊ शकलं नाही. काही रिपोर्ट्सनुसार गौहर खान आणि साजिद खान यांचा २००३ मध्ये साखरपुडा झाला होता. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही आणि ते वेगळे झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sajid khan once open up about why he did not marry gauhar khan video viral mrj