Smita Jaykar On Salman Khan Aishwarya Rai : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची नावे एकेकाळी खूप चर्चेत होती. त्यांच्या नात्याबद्दल खूप बातम्या आल्या होत्या आणि नंतर त्यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
सलमान आणि ऐश्वर्या यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता २६ वर्षांनंतर ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलले.
स्मिता जयकर यांनी या चित्रपटात ऐश्वर्याच्या आईची भूमिका साकारली होती. त्या आता शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबद्दल बोलल्या आहेत.
चित्रपटादरम्यान प्रेम झाले
स्मिता जयकर यांनी फिल्मी मंत्र मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शूटिंगदरम्यान कलाकार एकत्र बसून अंताक्षरी खेळत असायचे. सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल स्मिता म्हणाल्या, “हो, दोघेही तिथेच प्रेमात पडले. त्यांचे प्रेम प्रकरण तिथेच सुरू झाले आणि त्यामुळे चित्रपटालाही मदत झाली. दोघांचाही रोमान्स त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.”
सलमान खानबद्दल काय म्हणाल्या?
स्मिता सलमानबद्दल म्हणाल्या, “सलमान खूप खोडकर होता. तो आता कसा आहे हे मला माहीत नाही; पण त्यावेळी तो तसाच होता. तो एक चांगला माणूस आहे आणि त्याचं मन मोठं आहे. मी त्याला सेटवर कधीही रागावलेलं पाहिलं नाही. असा कोण आहे, जो रागावत नाही? पण लोक ते अतिशयोक्ती करतात. जर कोणी तुमच्यावर बोट दाखवलं, तर तुम्हाला नक्कीच राग येईल. आपल्याला माहीत नाही की, दुसऱ्या व्यक्तीनं असं काय केलं, ज्यामुळे तुम्हाला राग आला.”
ऐश्वर्याबद्दल स्मिता म्हणाल्या, “मेकअपशिवायही ऐश्वर्या खूप सुंदर आहे. ती खूप गोड आणि साधी आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्याव्यतिरिक्त अजय देवगणदेखील मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली.
या चित्रपटादरम्यान ऐश्वर्या आणि सलमानचे रिलेशनशिप सुरू झाले आणि नंतर २००२ मध्ये अभिनेत्रीने त्यांचे ब्रेकअप कन्फर्म केले. या रिलेशनशिपनंतर ऐश्वर्या पुढे गेली आणि नंतर अभिषेक बच्चनशी लग्न केले.