सलमान-सोनमच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित झाला आहे. राजश्री प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
भव्यदिव्य महालामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, यात सलमान खान दुहेरी भूमिकेत पाहावयास मिळणार आहे. राजकुमारच्या भूमिकेत ‘प्रेम’ तर दुस-या फाईटरच्या भूमिकेत ‘विजय’ अशा दोन भूमिका सलमान चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटात सलमान आणि सोनम कपूरसह अनुपम खेर, नील नितिन मुकेश, स्वरा भास्कर आणि अरमान कोहलीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
पाहाः सलमान-सोनमच्या ‘प्रेम रतन धन पायो’चा ट्रेलर
सलमान-सोनमच्या प्रेम रतन धन पायो चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित झाला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 02-10-2015 at 14:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan sonam kapoors prem ratan dhan payos trailer