समंथाने सांगितला सिटाडेल' इंडिया सिरीजमधला धक्कादायक प्रकार
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिने तिच्या सौंदर्याबरोबर अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप पाडली आहे. समंथा सध्या ‘सिटाडेल’ या सिरीजमध्ये काम करत आहे. या सिरीजमध्ये सामंथा पुन्हा एकदा राज आणि डीकेसोबत काम करताना दिसणार आहे. या मालिकेत तिच्याबरोबर वरुण धवनही आहे. या सिरीजच्या शुटींगदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत समंथाने खुलासा केला आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
समंथा म्हणाली, “मला सेटवर चक्कर आली. दोन-तीन तास मी सर्वांचे नाव विसरले होते. एवढंच नाही तर राजचही नाव मी विसरले होते. मी माझा फोन घेतला आणि त्यात त्यांच नाव शोधण्याचा प्रयत्न केला. याआधी मला कधीच अशा प्रकारची चक्कर आली नव्हती. मला माहित नाही हे सगळं काय होतं. पण काही तासानंतर मी बरी झाले आणि पुन्हा शूटींग केलं.
समंथा तिच्या ‘सिटाडेल इंडिया’ या प्रकल्पात जीव ओतून काम करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात, समांथाला सेटवर चित्रिकरणादरम्यान तिच्या हाताला जखम झाली होती. समंथाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोत तिच्या बोटांवर रक्ताचे डाग आणि जखम दिसत आहेत. रिपोर्टनुसार, समंथा वेब सीरिजमध्ये काही हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसणार आहे. सिटाडेल व्यतिरिक्त, सामंथा रुथ प्रभू देव मोहन सोबतचा तिचा बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘शाकुंतलम’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ चित्रपटातही झळकणार आहे.