घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…

आता मात्र समांथाला नागाचैतन्यच्या आठवण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. यानंतर समांथाने नागाचैतन्यला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करत त्याच्या सर्व आठवणी डिलीट केल्या होत्या. यानंतर आता मात्र समांथाला नागाचैतन्यच्या आठवण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

समांथाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर नागाचैतन्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच समांथाने नागाचैतन्यचा फोटो पोस्ट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. समांथाने नागाचैतन्यचा शेअर केलेला हा फोटो तीन वर्षांपूर्वीचा आहे. समांथाने माजिली चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर नागाचैतन्य हा रागात दिसत आहे.

समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

ही पोस्ट शेअर करताना समांथाने माजिली चित्रपटाल तीन वर्ष पूर्ण असे म्हटले आहे. माजिली हा चित्रपट ५ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट समंथा आणि नागाचैतन्य यांचा चौथा एकत्र आणि लग्नानंतरचा पहिला चित्रपट होता. त्यामुळे त्यांचे चाहते हे चांगलेच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँगमुळे ती चर्चेत आली.

समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samantha ruth prabhu posts first photo with naga chaitanya after separation as she celebrates special milestone nrp

Next Story
‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार की नाही? स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण
फोटो गॅलरी