Samay Raina on Ranveer Allahbadia Controversy : कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गदारोळ झाला आहे. या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आई-वडिलांच्या प्रायव्हसीवरून प्रश्न विचारला. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर रणवीरवर लोकांनी संताप व्यक्त केला. तसेच समय रैनावरही चौफेर टीका होत आहे. टीकेनंतर रणवीरने माफी मागितली होती. पण आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल समयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समय रैनाच्या शोमध्ये आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा व रणवीर अलाहाबादिया हे तीन एन्फ्लुएन्सर पाहुणे म्हणून आले होते. हे तिघेही स्पर्धकांचे परफॉर्मन्स बघून कमेंट्स करत होते. अशाच एका स्पर्धकाला रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीर अलाबादियावर लोकांनी टीकेचा भडीमार केला, तसेच समयलाही ट्रोल केलं. या दोघांविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आशिष व अपूर्वा यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर समयने मोठा निर्णय घेतला आहे.

समयने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सगळे एपिसोड्स त्याच्या युट्यूब चॅनलवरून हटवले आहेत. “सध्या जे काही चाललंय ते हाताळणं मला अवघड जातंय. “मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सगळे एपिसोड्स हटवले आहेत. या सगळ्यामागे माझा उद्देश फक्त लोकांना हसवण्याचा होता. मी सर्व तपास यंत्रणांना तपासात पूर्ण सहकार्य करेन,” असं समयने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून लिहिलं आहे.

समय रैनाची पोस्ट

समय रैनाची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

नेमकं प्रकरण काय?

शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, ‘तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?’ यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.

रणवीर अलाहाबादियाचं वक्तव्य व्हायरल झाल्यावर अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटींनी त्यांच्यावर टीका केली. विनोदाच्या नावाखाली अश्लीलता पसरवत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही जोर धरू लागली. त्यानंतर यासंदर्भात काही तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samay raina breaks silence on ranveer allahbadia controversy hrc