बॉलिवूड अभिनेता अजय देवगन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आधी तो ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील त्याच्या मुख्य भूमिकेमुळे चर्चेत होता. तर आता विमल पान मसालाच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. ‘बोलो झुबान केसरी’ या वाक्यावर तर मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान सुद्धा दिसत आहे. त्यामुळे अजय आणि शाहरूख दोघेही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे.

विमलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत, अजय देवगन एका अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करताना दिसतो. परदेशात विमलमुळे त्यांची भेट होते. ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच नेटकऱ्यांनी शाहरूखला ट्विटरवर ट्रोल केलं आहे.

एक नेटकरी म्हणाला, “विमलची जाहिरात केल्यानंतर शाहरूख त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला घराच्या बाहेर विमल वाटेल.” तर दुसरा म्हणाला, “शाहरूख खान विमलची जाहिरात करतोय? हे तेव्हाच होतं जेव्हा आपण तिन वर्ष काही काम करत नाही.” एक म्हणाला, “अक्षय कुमार आणि शाहरूखमध्ये हाच फरक आहे. अक्षय कुमार प्रोटीनची जाहिरात करतो तर शाहरूख विमलची एक सुपरस्टार लोकांच्या चांगल्या आरोग्याचा विचार करतो तर एक त्यांचे आरोग्य खराब करतो.”

शाहरूख तिन वर्षांनंतर आता ‘पठान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.