‘बिग बॉस ७’च्या प्रमोशनकरिता सलमान खान ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. या शोदरम्यान करण जोहरचे सलमानसोबत काम न करण्याचे गूढ उघडले. निर्माता-दिग्दर्शक करण आणि शाहरूखच्या खास मैत्रीमुळे हे दोघेही एकत्र काम करत नाहीत. सलमानने यापूर्वी करणच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
‘इफ्तार’ मेजवानीत शाहरूख-सलमान मनोमिलन
‘झलक दिखला जा’ शोचे सूत्रसंचालक मनिष पॉल आणि कपिल शर्मा यांनी परिक्षकांना कबुली जबाब देण्यास सांगितले होते. त्यावेळेस, करणची स्तुती करत सलमान म्हणाला की, कोणाच्यातरी दबावामुळे करण आपल्यासोबत काम करणे टाळत आहे. मात्र, मनिषने यामागे कोण व्यक्ती आहे हे जाणून घेण्याचा तगादा लावला असता ‘मुव्हिंग ऑन’ म्हणत करणने उत्तर देणे टाळले. त्यामुळे त्याची शाहरुखशी असलेली मैत्री यामागचे कारण असल्याचा अंदाज आहे.
बॉलिवूडमध्ये ‘मैत्रीचे’ वारे!
करण आता सलमानसोबत काम करण्यास उत्सुक आहे. परंतु, सोहेलचा ‘मेंटल’, साजिद नादियदवालाचा ‘किक’ आणि सूरज बरजातियाच्या चित्रपटांमध्ये आपण व्यस्त असल्याचे सलमान यावेळी म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan the reason why karan johar didnt work with salman khan