भारतभरात जन्मष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यंदा अभिनेता शाहरुख खान देखील हा उत्सव साजरा करणार आहे. जाम्बोरी मैदानातील दहीहंडी उत्सवात शाहरुख भाग घेणार असून, तो या ठिकाणची दहीहंडी फोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी हृतिक रोशन, अक्षय कुमार आणि इमरान खान यांनी देखिल दहीहंडी उत्सवात भाग घेतला होता. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱया दिवशी कृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी गोविंदांमार्फत दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबई आणि ठाण्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या खाली गोविंदा एकमेकांवर थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. नटखट बालकृष्णाच्या लोणी चोरण्याच्या बाललीलेवर दहीहंडी उत्सव आधारलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan to celebrate dahi handi on janmashtmi