बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच श्रद्धाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, या वेळी चर्चा ही शक्ती कपूर यांची होताना दिसत आहे.

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेते शक्ती कपूर हे त्यांच्या गाजलेल्या भूमिकां पैकी एक म्हणजे ‘क्राईम मास्टर गोगो’च्या भूमिकेत दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रद्धा नेल पॉलिश लावताना दिसते. त्यानंतर अचानक हळूच शक्ती कपूर येतात. त्यांना पाहून श्रद्धाला धक्का बसतो आणि ती बापू बोलते. शक्ती कपूर बोलतात, ‘क्राइम मास्टर गोगो’ परत आला आहे आणि आलो आहे तर कसली तरी चोरी करेन. यानंतर शक्ती कपूर श्रद्धाची नेल पॉलिश चोरी करतात. तर श्रद्धा बोलते, ‘हॉटस्टारला ‘क्राइम मास्टर गोगो’ला परत आणायची काय गरज आणि आता ते कुठून काही पण चोरी करतील.’

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करत “अरे बापू नेलपॉलिश तर सोडली असती. ‘गोगो’ परत आले आहेत. आले आहेत तर कसली तरी चोरी करतीलच…,” अशा आशयाचे कॅप्शन श्रद्धाने दिले आहे. शक्ती कपूर यांनी ‘क्राइम मास्टर गोगो’ ही भूमिका १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात साकारली होती. आता शक्ती कपूर यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की ते कोणत्या सीरिजमध्ये गोगोच्या भूमिकेत दिसणार आहे की कोणत्या चित्रपटात?

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

दरम्यान, श्रद्धा कपूर टायगर श्रॉफसोबत ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच तिचे ‘नागिन’ आणि ‘स्त्री २’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर ‘स्त्री’मध्ये श्रद्धा राजकूमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.