मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ते नेहमीत त्यांत मतं मांडताना दिसतात. नुकतंच शरद पोंक्षे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल रविवारी महाराष्ट्र दिनादिवशी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावर शरद पोंक्षेंनी त्यावर प्रतिक्रिया देत एक ट्वीट केलं आहे. “वा राजसाहेब वा. आम्ही भारतीय आज सुखावलो. बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार, विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत धन्यवाद.”, असे ट्वीट शरद पोंक्षेंनी केले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या उपस्थितीत केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा, भर सभेत टीझर प्रदर्शित

आणखी वाचा : आई कुठे काय करते : यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार का?

आणखी वाचा : “सलाम रॉकी बॉय…”, केजीएफ फेम यशची मुलगी देखील झाली वडिलांची फॅन

दरम्यान, या आधी राज ठाकरेंच्या ठाण्यात झालेल्या भाषणावर देखील शरद पोंक्षेंनी प्रतिक्रिया दिली होती. “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब.”, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe reaction on raj thackeray s aurangabad speech dcp