अभिनेत्री शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी व्हायरल व्हिडीओमुळे शहनाझचं नाव चर्चेत असतं. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाझचा असा अंदाज पाहायला मिळत आहे. जो याआधी कधीच कोणी पाहिला नसेल. शहनाझचं हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

शहनाझ गिलनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये हॉट पोझ देताना दिसत आहे. शहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. यावरून शहनाझच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल. शहनाझचा स्विमिंग पूलमधील हा हॉट अंदाज याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. तिच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

शहनाझ गिलच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत करत आहे. शहनाझ या चित्रपटासाठी उत्तम हिंदी बोलायला शिकत आहे. अलिकडेच ती सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीमध्येही दिसली होती. त्यावेळी तिचं सलमान खानशी खास बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळालं.