पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ११ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्राला चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये बोलावण्यात आलं होतं. राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन महत्वाची साक्षीदार आहे. यातच शर्लिन चोप्राने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केलाय ज्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शर्लिन चोप्राने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती राज कुंद्रासोबत दिसत आहे. शर्लिन चोप्राने हा फोटो तिच्या ‘द शर्लिन चोप्रा’ अ‍ॅपच्या पहिल्या शूटिंगवेळीचा असल्याचा दावा केलाय. फोटो शेअर करत तिने लिहिलंय, “२९ मार्च २०१९ चा दिवस, आर्म्सप्राइम आयोजित ‘द शर्लिन चोप्रा’ अ‍ॅपच्या पहिल्या कंटेंटचं शूटिंग सुरु होणार होतं. माझ्यासाठी नवा अनुभव होता कारण यापूर्वी कधी अशा अ‍ॅपसोबत काम केलं नव्हत. आशा आणि उत्साहाचं वातावरण होतं.” असं शर्लिन तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. हा फोटो सध्या सोशाल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा: “…तर तुम्ही गाढव आहात”, मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्कर संतापली

एनएनआय वृत्तसंस्थेला ८ ऑगस्टला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्राने राज कुंद्राने तिच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं होतं. राज कुंद्राने संपर्क साधला असून आपण करारही केल्याचं ती म्हणाली होती. राज कुंद्रा अ‍ॅपमध्ये फॅशन, फिटनेस आणि ग्लॅमरस व्हिडीओ अपोलड करणार होता. सुरुवातीला यात ग्लॅमरल व्हिडीओ होते मात्र कालांतरनाने ते सेमी न्यूड आणि नंतर तर न्यूड होत गेले असं शर्लिन म्हणाली होती.

तसचं राज कुंद्रा मला कायम प्रोत्साहन द्यायचा असही ती म्हणाली होती. सर्वात आधी महाराष्ट्र क्राइम ब्रांचकडे जाणारे आपणच असल्याचा दावा शर्लिन चोप्राने केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sherlyn chopra share photo with raj kundra from first adult shoot goes viral kpw