हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या बहुचर्चित ‘बँग बँग’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अबू धाबी येथे सुरु आहे. मात्र, चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याचा पारा चढल्याचे चित्र चित्रपटाच्या सेटवर आहे.
सिद्धार्थ सध्या काही महत्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण आहे. पण, या चित्रीकरणादरम्यान सेटवरचे फोटो काढून ते सोशल साइटवर प्रदर्शित होत असल्याचे सिद्धार्थच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सेटवरील सर्व कामगारांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. “सिद्धार्थ तरी काय करणार? त्याच्याकडे काहीच पर्याय राहिलेला नाही. चित्रीत करण्यात येत असलेली दृश्ये प्रेक्षकांच्या मनात भरतील अशी असून याबाबत लोकांना आधीच काही कळू नये असे त्याला वाटते. मोबाइल बंदीच्या निर्णयामुळे सेटवरील काम सुरळीत चालेल असे त्याला वाटते,” असे सेटवरील सूत्रांनी म्हटले आहे.
अजून दोन आठवडे हृतिक आणि कतरिना अबू धाबीमध्ये चित्रीकरण करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
‘बँग बँग’च्या सेटवर मोबाईलला बंदी!
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या बहुचर्चित 'बँग बँग' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अबू धाबी येथे सुरु आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-05-2014 at 04:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth anand bans mobile phones on the sets of bang bang