गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच मध्य प्रदेशातील संजय सरोवराचं पाणी सोडण्यात आल्यामुळे विदर्भात तिसऱ्या दिवशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. १४८ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. २७ हजार ७२१ पूरग्रस्तांपैकी १८ हजार २६१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान या प्रतिकूल परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करा, असं आवाहन अभिनेता सिद्धार्थ जाधव याने केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया

सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो रोखठोकपणे मतं मांडतो. यावेळी त्याने विदर्भातील पूरग्रस्त लोकांना मदत करा अशी विनंती केली आहे. “कोरोना संकटात ही नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. आपल्या महाराष्ट्रातील बांधव संकटात आहेत जमेल तशी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करूया. सर्वांसाठी प्रार्थना. असं ट्विट करुन महाराष्ट्रातील जनतेने पूरग्रस्तांनी मदत करावी, असं आवाहन त्याने केलं आहे.

घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…

एक लाख नागरिकांना पुराचा फटका

‘एनडीआएफ’च्या चार, ‘एसडीआरएफ’च्या चार आणि लष्कराचा एक चमू मदतकार्य करत आहे. पूरग्रस्तांमध्ये नागपूर जिल्ह्य़ाच्या ५७ गावांतील २७,९०१, भंडारा जिल्ह्य़ाच्या ५८ गावांतील ५५ हजार, चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील २१ गावांतील ४,८५९ आणि गडचिरोली जिल्ह्य़ाच्या १० गावांतील ३,०९८ नागरिकांचा समावेश आहे. पूरग्रस्त भागांतील शेकडो घरे कोसळली असून हजारो घरांत पाणी शिरले आहे. भंडारा जिल्ह्य़ांतील महापुराचा प्रकोप अधिक आहे. नदी काठाजवळील पिंडकेपर, कोरंभी ही गावे ४० तासांहून अधिक काळ पुराच्या वेढय़ात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhartha jadhav flood in maharashtra mppg