सिल्क स्मिता ही नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित आणि विद्या बालनचा ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. आजही या सिनेमातील विद्याचा अभिनय आणि सिल्क स्मिताच्या खऱ्या आयुष्याची चर्चा होते. विजयालक्ष्मी उर्फ ​​सिल्क स्मिताचे २३ सप्टेंबर रोजी निधन झाले. पण तिच्याबद्दल अजूनही काही मजेशीर गोष्टी आहेत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिल्क स्मिताचा जन्म २ सप्टेंबर १९६० रोजी ती आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल होते. सिल्कचे बालपण गरिबीत गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी अभिनेत्रीचे लहान वयातच लग्न लावून दिले. पण तिला सासरच्या लोकांकडून त्रास होत असे, त्यामुळे ती घरातून पळून गेली असं सांगितलं जातं. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी तिने चित्रपटसृष्टीत यायचं ठरवलं. तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या भूमिका तिला मिळू लागल्या. १७ वर्षांच्या कारकिर्दीत सिल्क स्मिताने ४५० चित्रपटांमध्ये काम केले.

आणखी वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’बद्दल चित्रपटसृष्टीने बाळगलंय मौन; विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य चर्चेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा सिल्क स्मिताच्या अर्धा खाल्लेल्या सफरचंदाचा लिलाव करण्यात आला होता. आणि त्याची किंमत एक लाख रुपये होती. झालं असं की सिल्क सेटवर शूटिंग करत होती. तिथे ती सफरचंद खात होती पण दिग्दर्शकाने त्याला शॉटसाठी बोलावले त्यामुळे तिने अर्धवट खाल्लेलं सफरचंद तिथेच ठेवलं होतं. तेव्हा सेटवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ते अर्धवट खाल्लेलं सफरचंद लंपास केले.

काही मीडिया रीपोर्टनुसार त्या व्यक्तिने त्या सफरचंदाचा लिलाव केला. काहींच्या मते त्याला या सफरचंदाचे २००० रुपये मिळाले तर काहींच्या मते त्याला २६००० ते १ लाख अशी रक्कम मिळाली. अद्याप या गोष्टीची पुष्टी होऊ शकलेली नाही, पान त्यावेळी या गोष्टीने सिल्कची लोकप्रियता आणखीनच वाढली. स्क्रीनवरील आपल्या बोल्ड आणि मादक भूमिकांमुळे अन चाहत्यांच्या या प्रचंड प्रेमामुळे ती कायम लाईमलाइटमध्येच राहिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silk smitha half bitten apple was auctioned for rupees one lakh as per media reports avn