बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु होती, मात्र बॉक्स ऑफिसवर निराशा झाली. आता यावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात सोनू सूदने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात सोनू सूद हा चांद बरदाईच्या भूमिकेत आहे. त्याच्या कामाचं कौतुक चाहत्यांकडून होत आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदला चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही याबाबत विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, “हा चित्रपट खास असा आहे. मला यात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लोकांनीही खूप प्रेम दिलं. मी माझ्या प्रेक्षकांचे या प्रेमासाठी आभार मानतो.”

“चित्रपटाला कदाचित अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आम्हाला हे मान्य करायची गरज आहे की कोरोनाच्या साथीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मला विचाराल तर लोकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.” असंही सोनू सूदने म्हटलं आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ने बॉक्स ऑफिसवर १०.७० कोटी रुपयांसह पहिल्या दिवशी खातं उघडलं होतं. त्यानंतर शनिवारी १२.६० कोटी तर रविवारी १६.१० कोटी रुपये कलेक्शन झालं होतं. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. आता पुढच्या काही दिवसात किती कमाई करते हे बघावं लागेल. अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या तुलनेत कार्तिक आर्यनची ‘भूल भुलैय्या २’ची कमाई चांगली होत असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood reaction on samrat prithviraj box office flop response mrj