फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि एनटीआर ज्युनिअरचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटात असलेल्या ‘दोस्ती’ गाण्याचा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी त्यांच्या युट्यूब अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राम चरण आणि एनटीआर ज्युनिअर शेवटी येतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चाहते मैत्रीचं प्रतिक असल्याचे बोलत आहेत. ‘फ्रेंडशिप डे निमित्त. दोन पराक्रमी रामराजू आणि भीम एकत्र येत आहेत,’ अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या पोस्टमध्ये राजमौली यांनी गाण्याची युट्युब लिंक शेअर केली आहे.

आणखी वाचा : रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला…

हे गाणं पाच गायकांनी गायलं आहे. अनिरुद्ध रविचंद्रन, विजय येसुदास, अमित त्रिवेदी, हेमचंद्र आणि याझिन निझर हे ते गायक आहेत. हे गाणे तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं एम एम कीरवानी यांनी संगीतबद्ध केले आहे.

आणखी वाचा : ‘रितेश ८ वेळा माझ्या पाया पडला होता’; जेनेलियाने सांगितला लग्नातील किस्सा

या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे मोठे कलाकार दिसणार आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख १३ ऑक्टोबर निश्चित केली आहे.