"मुलगी झाली हो मालिकेतील अधिकृतरित्या निरोप…" प्रसिद्ध अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत | Star Pravah Mulgi Zali Ho Marathi Serial last day actor siddharth khirid instagram post nrp 97 | Loksatta

“मुलगी झाली हो मालिकेतील अधिकृतरित्या निरोप…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या निमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

“मुलगी झाली हो मालिकेतील अधिकृतरित्या निरोप…” प्रसिद्ध अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मुलगी झाली हो

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. या मालिकेत एसीपी सिद्धांत ही भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने या मालिकेतून लवकरच निरोप घेण्याबद्दल सांगितले आहे.

अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा सोशल मीडियावर फारच चर्चेत असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच त्याने मुलगी झाली हो या मालिकेबद्दल एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेत त्याने एसीपी सिद्धांत ही भूमिका साकारली आहे. आज या मालिकेतील शूटींगचा त्याचा शेवटचा दिवस होता. या निमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्याला त्याने भावूक कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार की नाही? स्टार प्रवाहने दिले स्पष्टीकरण

सिद्धार्थ खिरीडची इन्स्टाग्राम पोस्ट

“माझा मुलगी झाली हो या मालिकेतील एसीपी सिद्धांत या पात्राला अधिकृतरित्या निरोप. ज्या पात्राने मला आनंद दिला आणि लोकांचे अपार प्रेम दिले. आता माझ्या पात्राने या मालिकेतून एक्झिट घेऊन दोन महिने झालेत. पण जेव्हा मी याबद्दलचे मेसेज, कमेंट्स पोस्ट याबद्दल वाचतो तेव्हा मला फार छान वाटते. माझी शोमध्ये पुन्हा झालेली एंट्री तसेच हे पात्र विरोधी असले तरी लोक त्या पात्राची अजूनही आठवण काढतात याबद्दल मला खरंच फार कौतुक वाटतं.

स्टार प्रवाह आणि पॅनरोमो इंटरटेनमेंट यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. लेखक, दिग्दर्शक, डीओपी, लाईट दादा, स्पॉट दादा, कॉन्स्ट्युम, माझे सर्व स्क्रीन कलाकार, प्रेक्षक, फॅन पेज आणि या प्रोजेक्टशी जोडलेल्या प्रत्येकाचे खूप खूप आभार…. एसीपी सिद्धांत भोसलेचा अखरेचा नमस्कार”, असे सिद्धांत खिरीडने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच अभिनेते किरण मानेंची पोस्ट, म्हणाले “कटकारस्थान रचून…”

सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘कुठे पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणे गरजेचे आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘कृपया लवकरच काहीतरी नवीन घेऊन आम्हाला भेटायला ये… वाट बघतोय तुझी… मिस यू….लव्ह यू सो मच’ असे नेटकरी म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“ज्या चित्रपटात मी धावतो तो…” अभिनेता शाहरुख खानने दिली होती कबुली

संबंधित बातम्या

‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
Padmavati Row : इतिहासकारांची विशेष समिती पाहणार ‘पद्मावती’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी