बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकतंच मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. मुंबईतल्या अंधेरी भागात तिचं हे नवीन घर असणार आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती!
सनी लिओनीने मुंबईतल्या अंधेरी भागात ४,३६५ चौरस फूटाचा फ्लॅट खरेदी केला आहे. याची किंमत आहे १६ कोटी रुपये. यासाठी तिला स्टॅम्प ड्युटी म्हणून ४८ लाख रुपये भरावे लागले. हा व्यवहार २८ मार्चला झाल्याची नोंद आहे.हा फ्लॅट बाराव्या मजल्यावर असणार आहे. या फ्लॅटचं काम अजून सुरु आहे. रिऍल्टर क्रिस्टल प्राईड डेव्हलपर यांचा हा प्रकल्प आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, सनीला तीन गाड्यांसाठी मेकॅनाईझ्ड कार पार्किंगही मिळणार आहे.
या फ्लॅटचा संपूर्ण व्यवहार सनीने आपल्या खऱ्या नावाने केला आहे. सनी लिओनीचे खरे नाव करेनजीत कौर वोहरा असं आहे. रिअल इस्टेट तसेच त्याच्याशी संबंधित जवळपास २६० क्षेत्रांना उभारी देण्यासाठी घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासोबतच सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात करण्याची घोषणाही केली आहे. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत ३% स्टॅम्प ड्युटी लागू करण्यात आली होती.
सनी लिओनीने २०१२ सालच्या ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘तेरा इंतजार’ असे हिंदी चित्रपट केले. तसंच ‘मधुरा राजा’ या मल्याळम चित्रपटातही तिने काम केलं आहे. ‘स्प्लिट्सव्हिला’ या कार्यक्रमाचं निवेदनही तिने केलं आहे. त्याचसोबत ती ‘बिग ब़़ॉस’ या कार्यक्रमातही सहभागी झाली होती.