अभिनेत्री सुष्मिता सेनने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. आजची सुष्मिताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही सुष्मिता चांगलीच सक्रिय असून आपल्या दोन्ही मुलींसोबत वेळ घालवताना दिसते. सुष्मिताने ती २४ वर्षांची असताना रेनी या तिच्या पहिल्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तर २०१० साली तिने अलिशा या तिच्या दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. सुष्मिताने एकटीने या मुलींचा सांभाळ केलाय.
सुष्मिताची मुलगी रेनी आता चांगलीच मोठी झाली असून बॉलिवूड पदार्पणासाठी ती सज्ज आहे. तसचं तिने आधीच ‘सुतबाजी’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. अलिकडेच रेनीने पिपंगमुनला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केलाय. यावेळी रेनीला तिच्या खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना ती काय उत्तर देते हे रेनीने सांगितलं आहे. यावर रेनी म्हणाली, “सोशल मीडियावर खऱ्या आईबद्दल प्रश्न करणाऱ्यांना मी एवढचं म्हणते की कृपया खऱ्या आईची व्याख्या सांगा?”
पुढे रेनी म्हणाली की तिला दत्तक घेण्यात आलंय हे सगळ्यांना माहित आहे आणि ते उघड आहे. “मात्र इतरांबद्दल काय? त्यांच्यावर कदाचित याचा परिणाम होवू शकतो त्यामुळे या गोष्टींबाबत आपण थोडसं संवेदनशील असण्याची गरज आहे.” असं रेनी म्हणाली आहे.
नुकत्याच इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’ या सेशनमध्ये एका नेटकऱ्याने रेनीला विचारलं “तुला तुझी खरी आई कोण माहितेय का? फक्त जाणून घ्यायचं होतं. सुष्मिता मॅम तर मस्तच आहेत” यावर रेने उत्तर देत म्हणाली, “माझा जन्म माझ्या आईच्या हृदयात झाला आहे आणि हे तितकचं सत्य आहेत.
हे देखील वाचा: ‘या’ कारणासाठी नोरा फतेहीने टायगर श्रॉफसोबत ‘गणपथ’ सिनेमात काम करणं नाकारलं
काही दिवसांपूर्वीच रेनीने ती सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे कसं पाहते यावर प्रतिक्रिया दिली होती. यावर ती सोशल मीडियावरील कमेंट्स वाचत नाही असं म्हणाली होती. रेनी देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.