करीना कपूर आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव समोर आलं आहे. करीना कपूरच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असल्याचं म्हंटलं आहे. करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं नाव जहांगीर असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरताच आता नेटकऱ्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. करीनाने दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानंतर सोशल मीडियावरून करीना आणि सैफ अली खानला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीनाला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यात आल्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने करीनाला पाठिंबा देत ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. स्वरा भास्करने एक ट्वीट करत ट्रोलर्सवर संताप व्यक्त केलाय. या पोस्टमध्ये तिने लिहलंय, “जर एखाद्या दाम्पत्याने आपल्या मुलांची नावं ठेवली आहेत आणि ते दाम्पत्य तुम्ही नाही. मात्र तुम्हाला हे नाव काय आहे? आणि कशाला असे विचार येत असतील, यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जात असतील,,,तर तुम्ही मोठे गाढव आहात.” असं म्हणत स्वराने नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

पहा फोटो: “करीना आणि सैफ मुघलांची आयपीएल टीम बनवत आहेत”, दुसऱ्या मुलाच्या नावावरून करीना कपूर ट्रोल

तसंच हॅशटॅग मधुन स्वराने स्वत:च्या कामात लक्ष द्या असं म्हणत नेटकऱ्यांना इतरांच्या आयुष्यात डोकावू नका असं बजावलंय.

हे देखील वाचा: “तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना…”; करीना कपूरने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा

करीना कपूर आणि सैफ अली खानने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर या नावामुळे करीना आणि सैफला ट्रोलही करण्यात आलं होतं. सैफ करीनाने भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूर या प्रशासकाचं नाव का ठेवलं असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफिनावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय अशा चर्चा रंगत असतानाच दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं समजताच नेटकऱ्यांनी करीना कपूरवर टीका करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker slams who troll kareena kapoor for second son name jehangir said donkey kpw