शूटिंगची धावपळ आणि व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा वेगवेगळ्या देशांमध्ये भटकंती करताना दिसते. सध्या तापसी बहीण शगुनसोबत रशिया टूर एन्जॉय करतेय. रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात तापसी बहिणीसोबत धमाल करताना पाहायला मिळतेय. तापसीने तिच्या या सफरनाम्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअऱ केले आहेत.
कधी रशियातील रस्त्यावर बायसिकल चालवताना तर कधी रशियातील कॉफी टपरीवर कॉफीची मजा लुटतानाचे अनेक फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एवढचं नाही तर चक्क साडी परिधान करूनही तापसी रशियातील विविध ठिकाणांना भेट देतेय. मात्र नुकताच तापसीने शेअर केलेला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात तापसीने पांढळ्या रंगाची कॉटन साडी परिधान केल्याचं दिसतंय. तर साडीवर तापसीने चक्क स्निकर्सला पसंती दिलीय. साडीवर शूज आणि गॉगल्समधली या हटके लूकमध्ये तापसी बिनधास्तपणे सेंट पीटर्सबर्गमध्ये फिरताना दिसतेय.
“डीनरला लेट होतंय..पळा…” अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. तापसीच्या या फोटोला अनेक चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनी देखील पसंती दिलीय. अभिनेत्री दिया मिर्झाने ‘लव्ह इट’ अशी कमेंट केलीय.
या आधीदेखील तापसीने बहीण शगुनसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तापसीने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
तापसी लवकरच ‘हसीन दिलरुबा’ या नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तापसीसोबतच अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन रामे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. २ जुलैला हा सिनेमा रिलिज होतोय. याशिवाय तापसी ‘रश्मी रॉकेट’, ‘लूप लपेटा’ या सिनेमांमधूनही झळकणार आहे.