छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा पुन्हा एकदा लग्न केले आहे. तिच्या लग्नात तारक मेहताची संपूर्ण टीम आली होती. मात्र, त्यांच्या लग्नात टप्पू आणि बबीता पोहोचले नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहूजा आणि टप्पू सेना यांचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे तिच्या लग्नात संपूर्ण टप्पू सेना आली होती. एवढंच काय तर जुनी सोनू निधी भानुशालीही वेगळ्याच रुपात पोहोचली होती. पण टप्पू म्हणजेच राज अनादकटने काही हजेरी लावली नव्हती.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

प्रियाने दिग्दर्शक पती मालवा राजदा यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्न केले आहे. १९ नोव्हेंबर रोजी प्रिया आणि मालव राजदा यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत. याचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत ‘परिंची कहाणी खरी झाली’, असे कॅप्शन प्रियाने दिले आहे.

आणखी वाचा : लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण? ‘हे’ ठरलं कारण…

प्रिया आणि मालवाला २ वर्षांचा मुलगा आहे. आई-वडिलांचे लग्न होताना पाहून तो फार आनंदी होता. दरम्यान, लग्नाच्या ८ वर्षांनंतप म्हणजेच २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रियाने तिच्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या लग्नात तारक मेहता…च्या टीमने हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah raj anadkat and munmun dutta did not reach in rita reporter wedding dcp