बॉलिवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिरचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमिर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि किरण रावचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर आता तिसरं लग्न कोणत्या अभिनेत्रीशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आणि यावरून आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाने लग्न केले आहे. दुसरीकडे डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना लग्न करणार अशा चर्चा आहेत. एवढंच काय तर रणबीर आणि आलियाही लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. आता आमिरने त्याच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु केली असे म्हटले जाते. आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस; जाणून घ्या कारण… आणखी वाचा : राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा ‘या’ गोष्टीवर करतोय १०० कोटी खर्च? दरम्यान, आमिरने अजून यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी देखील त्याच्या लग्नाच्या चर्चा सुर आहेत. असं म्हटले जाते की आमिर लाल सिंग चढ्ढा हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिरनं १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं.