तामिळ अभिनेत्री विचित्रा सध्या ‘बिग बॉस तामिळ’च्या ७ व्या पर्वात स्पर्धक आहे. या शोमध्ये तिने २० वर्षांपूर्वी सिनेसृष्टी का सोडली? याबाबत खुलासा केला आहे. घरातील एका टास्कचा एक भाग म्हणून तिचा अनुभव शेअर करताना तिने एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे तिला इंडस्ट्री सोडावी लागली. जवळपास एक दशक सिनेसृष्टीत काम करून लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने हे क्षेत्र सोडलं होतं. केरळमधील मलमपुळा इथे एका तेलुगू चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेमुळे आपण या क्षेत्राला अलविदा केल्याचं तिने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विचित्रा म्हणाली, “आता हयात नसलेल्या एका अभिनेत्याच्या विनंतीवरून मी मलमपुळा चित्रपटात काम करायला गेले होते. तिथेच मी माझ्या पतीलाही भेटले. तो मी शूटिंगदरम्यान राहत असलेल्या हॉटेलमध्ये काम करत होता. मला तिथे खूप समस्या होत्या. त्या कास्टिंग काउचबद्दल होत्या. त्या चित्रपटावेळी मी याचा सर्वाधिक सामना केला. मी २००० नंतर सिनेसृष्टीतून गायब होण्याचं कारण ती घटना होती. त्यावेळेस ही एक मोठी घटना बनली आणि वृत्तपत्रात त्याच्या बातम्याही आल्या. एके दिवशी बिग बॉस आपल्याला सांगत होते की आपण शत्रूंचा सामना केला पाहिजे. जर मी आता त्याबद्दल बोलले तर कदाचित मी त्या शत्रूंवर, राक्षसांवर विजय मिळवेन. ”

विवाहित असून प्रेमात पडले, काहींनी पहिल्या पत्नीला सोडून लग्नंही केली पण अखेर त्यांच्याकडेच परतले ‘हे’ सेलिब्रिटी

त्या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना विचित्रा हॉटेलमध्ये आल्यावर तिथल्या व्यवस्थापनाने त्यांना ‘थ्री स्टार’ दर्जा मिळाल्याने पार्टी दिली होती. विचित्राला मॅनेजरने (आताचा तिचा पती) कार्यक्रमाला येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. “मी तिथे पहिल्यांदाच चित्रपटाच्या हिरोला भेटले. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याने मला विचारलं, ‘तू चित्रपटात काम करत आहेस का?’ मी ‘हो’ म्हणाल्यावर तो म्हणाला, ‘माझ्या खोलीत ये.’ त्याने माझे नाव किंवा मी कोण आहे हे विचारण्याचीही तसदी घेतली नाही, मला धक्का बसला. नेमकं काय घडतंय, हे मला कळत नव्हतं. त्या रात्री मी माझ्या खोलीत जाऊन झोपले,” असं विचित्राने सांगितलं. यासंदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलंय.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

दुसर्‍या दिवसापासून विचित्राला त्रास देणं सुरू झालं. “शॉट वेळेवर झाले नाही. सेटवर अनेक समस्या होत्या. संध्याकाळी सहा नंतर सर्वजण दारू प्यायले आणि माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले. मला अजूनही दरवाज्यांची टकटक आठवते. मी रिसेप्शनला सांगितलं की माझ्या खोलीत कोणतेही कॉल कनेक्ट करू नका आणि मला एकटं सोडा. मला माझं काम करून निघायचं होतं, पण तसं झालं नाही आणि हा त्रास देण्याचा प्रकार वाढतच गेला,” असं विचित्रा म्हणाली.

करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

त्या अडचणीच्या वेळी हॉटेल मॅनेजर आत आला आणि आपल्याला मदत केल्याचं विचित्राने सांगितलं. “तेव्हा तो माझा मित्रही नव्हता, पण काय घडतंय हे त्याला माहीत होतं. त्याने मला विचारलं की मला तो कशी मदत करू शकतो. मी त्याला सांगितलं की मला खोली बदलायची आहे आणि मी कुठे आहे हे कोणालाही कळता कामा नये. त्यानंतर तिथल्या शेड्यूलमध्ये त्याने मला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिफ्ट केले. काही वेळा मी माझ्या आधीच्या खोलीच्या समोरच्या खोलीत असायचे आणि मला त्यांचे आवाज तिथे ऐकू यायचे. तो फक्त एक जण नव्हता, अनेक होते. परिस्थिती अशी झाली होती की मला स्वतःबद्दलच वाईट वाटायचं,” असा खुलासा तिने केला.

पाच अभिनेत्यांनी नाकारली भूमिका, पण ‘या’ चित्रपटाने पटकावलेले चार राष्ट्रीय पुरस्कार, अवघ्या १६ कोटींचे बजेट अन् कमावलेले ५२ कोटी

प्रीतीपासून वेगळे झाल्यानंतर इम्तियाजचे नाव ऑस्ट्रेलियन शेफशी जोडले गेले. इम्तियाज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं गेलं. अशातच २०२० मध्ये करोनामुळे लॉकडाऊन लागलं. यावेळी तो मुलीसोबत राहण्यासाठी पत्नी प्रीतीच्या घरी गेला. तेव्हापासून आजपर्यंत प्रीती आणि इम्तियाज एकत्र राहत आहेत.

जे विचित्राचा छळ करण्याचा प्रयत्न करत होते, ते वैतागले होते कारण ही त्यांच्या तावडीत सापडत नव्हती. त्यांनी हिला धडा शिकवायचं ठरवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखी बिघडली. त्यादिवशी एका गावात दंगलीचे दृश्य शूट करायचे होते. या शूटिंगदरम्यान विचित्राला वाईट स्पर्श केला गेला. तिसर्‍यांदा असं घडल्यावर तिने त्या मुलाला पकडले आणि स्टंट मास्टरकडे तक्रार करण्यासाठी खेचले. “स्टंट मास्टरने माझा हात झटकला आणि मला थोबाडीत मारली. मी आजुबाजूला पाहत होते की कोणी माझ्या मदतीला येतंय का, पण कोणीच आलं नाही. मग मी सेटवरून बाहेर पडले. मला भीती वाटत होती, रागही येत होता अन् लाजही वाटत होती,” असं विचित्रा म्हणाली.

या घटनेनंतर विचित्राने चेन्नईतील कलाकारांच्या संघटनेशी संपर्क साधला. तिला सेटवर परत येऊन तक्रार लिहिण्यास सांगण्यात आलं. मात्र, तिने प्रयत्न करूनही त्या लोकांविरोधात काहीही कारवाई झाली नाही. “मला कोणीही मदत करायला आलं नाही. बलात्कार झाला तरंच तो गुन्हा असतो असं नाही, एखाद्याला मारहाण करणे, सर्वांसमोर कारण नसताना मारणे हाही गुन्हा आहे. तेव्हा मला पोलिसांकडे जाण्यास सांगण्यात आलं होतं,” असं विचित्रा म्हणाली.

घडलेली घटना आठवून विचित्राला रडू कोसळलं. “त्यांच्याविरोधात काहीच कारवाई झाली नाही. मी अभिनय चालू ठेवावा की नाही हे मला कळत नव्हतं. मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत होती. या सिनेक्षेत्रातील एकही माणूस मला मदत करायला पुढे आला नाही. कदाचित, प्रत्येकाला वाटलं असेल की मी त्यास पात्र आहे कारण त्यांना वाटलं ही एक सामान्य गोष्ट आहे. संगमच्या (कलाकारांची संघटना) अध्यक्षांनी मला सांगितलं की झालं ते सर्व विसरून जा आणि कामावर जा. पण ते मी आजपर्यंत विसरू शकले नाही. त्यानंतर माझे पती (तेव्हाचा हॉटेल मॅनेजर) मला तपासात मदत करत होते. त्यांनी मला एक विचारलं, ‘तू यासाठी काम करत आहेस का? एखाद्या ठिकाणी मान-सन्मान नसेल, तर तिथे कशाला काम करायचं?’ मला फिल्म इंडस्ट्री हे माझं कुटुंब वाटत होतं, पण ते माझं कुटुंब नाही याची मला जाणीव झाली. त्याच वेळी मी हे क्षेत्र सोडायचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉटेल मॅनेजरने मला लग्नासाठी विचारलं. आम्ही लग्न केलं, त्याने मला एक चांगलं आयुष्य आणि तीन मुलं दिली,” असं विचित्रा म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil film actress vichitra reveals she quit films 20 years ago due to sexual harassment at set hrc