अजित कुमारचा थ्रिलर चित्रप ‘थुनिवू’ या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी झाला होता. नुकतंच अजितच्या वडिलांचे निधन झाले. सध्या अभिनेता यातून स्वतःला सावरत आहे. याबरोबरच दिग्दर्शक मागिझ थिरुमेनी आणि लायका प्रॉडक्शनसह त्याचा ६२ वा चित्रपट ‘AK62’ यावर काम सुरू करण्याच्या तयारी करत आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनयाबरोबरच अजित कुमार त्याच्या मदतशील आणि शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच, अजित कुमारने ग्लासगो ते चेन्नईच्या फ्लाइट दरम्यान एका महिलेला आणि तिच्या १० महिन्यांच्या बाळाला सामानासह फ्लाइटमध्ये बसवून देण्यात मदत केली. महिलेच्या पतीने अभिनेत्याच्या या कृतीचे कौतुक करत आणि या सुपरस्टारचे आभार व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे जी चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर आपटलेला कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ मध्यरात्रीच झाला OTT वर प्रदर्शित; वाचा कुठे पाहता येणार?

महिलेच्या पतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझी पत्नी आज ग्लासगो ते चेन्नई प्रवास करत आहे. ती आमच्या १० महिन्यांच्या बाळासह एकटीच प्रवास करत आहे. तिला आज लंडन हिथ्रो येथे सुपरस्टार अजितकुमारला भेटण्याची संधी मिळाली. ती केबिन सुटकेस घेऊन प्रवास करत होती. आणि एक बेबी बॅगसुद्धा तिच्याकडे होती. तर या सुपरस्टारने माझ्या बायकोच्या हातातील बेबी बॅग हातात घेत तिला फ्लाइटपर्यंत सोडायला मदत केली. माझी पत्नी एकटी आहे हे कळताच त्यांनी असे केले. पत्नीने जेव्हा यासाठी नकार दिला तेव्हा ते तिला नम्रपणे म्हणाले, “ठीक आहे. मलाही दोन मुले आहेत. त्यामुळे मी समजू शकतो.”

postforajithkumar

अजितने त्या महिलेला फ्लाइटपर्यंत सोबत केली, आणि केबीन क्रूच्या लोकांकडून तिची बॅग तिच्या सीटवर पोचल्याची खात्रीही केली. सोशल मीडियावर अजित कुमारच्या या कृतीचं प्रचंड कौतुक होत आहे. तमिळ सुपरस्टार अजित कुमार अशा बऱ्याच गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतो. ‘विश्वासम’, ‘वेदालम’ आणि ‘वीरम’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अजितचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘एन वीजु एन कानावर’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil superstar ajith kumar helps young lady with a child and bags at airport avn