‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मागच्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दयाबेन गोकुळधान सोसायटीमध्ये परतणार असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या प्रोमोनंतर शोमध्ये दिशा वकानी पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहेत. यावर आता शोचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असिद मोदी म्हणाले, “शोमध्ये दयाबेनची व्यक्तीरेखा पुन्हा एकदा दिसणार आहे. मात्र ही भूमिका दिशा वकानी साकारणार नाही. दिशाच्या रिप्लेसमेंटसाठी ऑडिशन सुरू आहेत आणि लवकरच नवी अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारताना दिसणार आहे.” याशिवाय असित मोदी यांना दिशानं ५ वर्षांपूर्वीच शो सोडला होता मग तिच्या रिप्लेसमेंटसाठी एवढा वेळ का लागला असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, “दिशानं लग्नानंतरही काही काळ आमच्यासोबत काम केलं होतं. त्यानंतर तिने प्रेग्नंसीसाठी ब्रेक घेतला. तिने कधीच शो सोडला नव्हता.”

आणखी वाचा- ‘तारक मेहता…’ मालिकेत तब्बल सहा वर्षांनी ‘गरबा क्वीन’ दयाबेन परतणार, प्रोमो व्हायरल

असित मोदी पुढे म्हणाले, “आम्हाला अपेक्षा होती की, दिशा परत येईल. पण त्यानंतर करोना आणि लॉकडाऊन अशा सर्व गोष्टी घडल्या. अशात शूटिंगसाठी बरेच निर्बंध होते आणि त्याकाळात शूटिंग करण्यास दिशाला भीती वाटत होती. दिशा आणि शोचं खूप जुनं नातं आहे त्यामुळा आम्ही वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आजही दिशा अधिकृत स्तरावर या शोचा भाग आहे, आमच्या कुटुंबाचा भाग आहे. अलिकडेच ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे ती शोमध्ये परतणार नाही. त्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रींच्या ऑडिशन घेतल्या जात आहेत.”

आणखी वाचा- पतीपासून २७ वर्षं वेगळं राहूनही डिंपल यांनी घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता यामागचं कारण?

दरम्यान दिशा वकानी मागच्या ५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिसलेली नाही. २०१७ मध्ये प्रेग्नंसीच्या कारणानं दिशानं या शोमधून ब्रेक घेतला होता. अलिकडेच मे महिन्यात तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दिशाला दयाबेनच्या भूमिकेत प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळे नव्या दयाबेनला दिशासारखी लोकप्रियता मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarak mehta ka oolta chashma asit modi react on disha vakani come back in show mrj