छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असून प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत बबीताजी ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता तिच्या अभिनया सोबतच सुंदरतेमुळे चर्चेत असते. मालिकेत जरी ती साधी आणि सोज्वळ दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुनमुन दत्ता हिने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला खरी ओळख ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधून  मिळाली. तिच्या अभिनयाने जेठालाल सोबत तिने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी मुनमुनने ‘स्टूडेंट’ या साऊथ इंडिअन चित्रपटातच्या एक आयटम सॉंगमध्ये काम केलं होतं. या गाण्यात  तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायाला मिळाला आहे. या गाण्यात मुनमुन डान्स करताना दिसली आहे. तिने या व्हिडीओत वेगवेगळ्या रंगाचे स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचे पाहायला मिळते आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

दरम्यान मुनमुन दत्ता ही मालिकेत जेठालालचा मुलगा टप्पू अर्थात राज अनादकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. हे दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. मात्र दोघांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarak mehta ka ulta chasma babita ji aka munmun dutta bold item song form south film went viral aad