Aai Kuthe Kay Karto Fame Actor Went To North Finland : सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे देश-विदेशातील अनेक अनएक्सप्लोर जागा प्रकाशझोतात येत आहेत. अलीकडची तरुण मंडळी आपल्या देशातील विविध जागा असो किंवा परदेशातील सुंदर ठिकाणं… लॉकडाऊननंतर भटकंती करण्यासाठी सगळेच उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. आता यात सेलिब्रिटी सुद्धा मागे राहिलेले नाहीत. विराट कोहली-अनुष्का शर्मा, वरुण धवन अशी बॉलीवूडमधली अनेक मंडळी गेल्या काही वर्षांत नॉर्थ फिनलँड फिरून आली. आता हळुहळू फिनलँडची भुरळ मराठी कलाकारांना देखील पडू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नील सालेकर काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबीयांसह ‘नॉर्दर्न लाइट्स’ पाहायला गेला होता. आता या पाठोपाठ मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता सपत्नीक फिनलँड फिरण्यासाठी गेला आहे. फिनलँडला जाण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे ‘नॉर्दर्न लाइट्स’. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने नुकतीच फिनलँडला भेट दिली असून अभिनेत्याने ‘नॉर्दर्न लाइट्स’ पाहण्याचा सुंदर अनुभव इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

अभिषेक लिहितो, “‘नॉर्दर्न लाइट्स’चा प्रवास… नॉर्थ फिनलँडच्या रोव्हानेमी, फिन्निश लॅपलँडहून उत्तरेला ६ तास अरोरा लाइट्सचा पाठलाग करत स्वीडनची बॉर्डर क्रॉस केली आणि निसर्गाची नेत्रदिपक किमया अनुभवली. कॅमेरात कॅप्चर झालेले लाइट्सचे रंग आम्ही उघड्या डोळ्यांनी सलग ४० मिनिटं पाहिले. lorenzmira_lapland या माणसाचे विशेष आभार. तू या प्रवासामागचा खरा शिलेदार आहेत. काय ती सुंदर रात्र! काय तो भव्य शो! हिमवादळ आणि थंडगार तापमान (-११°C) १२ तास वेड्यासारखा प्रवास केला त्याचं सार्थक झालं.”

अभिषेकच्या फोटोंमध्ये ‘नॉर्दर्न लाइट्स’चं सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्याने Snowfall ची झलक सुद्धा याच पोस्टमध्ये शेअर केली आहे.

दरम्यान, अभिषेक देशमुखच्या पोस्टवर कौमुदी वलोकर, नम्रता संभेराव, दिपाली पानसरे, आशुतोष गोखले, स्वानंदी टिकेकर, रसिका वेंगुर्लेकर, शंतनु मोघे या सगळ्या कलाकारांनी कमेंट्स करत निसर्गाची इतकी सुंदर किमया पाहिल्याबद्दल अभिषेक आणि त्याची पत्नी कृतिका यांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame abhishek deshmukh went to watch northern lights with wife shares photos sva 00