छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नेहमीच काही ना काही ट्वीस्ट पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनिरुद्ध हा ईशा आणि अनिशच्या लग्नाला विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वीणा अनिरुद्धला नोकरीवरुन काढून टाकते. त्यामुळे तो संतापला आहे. यावरुन आता अनिरुद्ध फेम अभिनेते मिलिंद गवळींना ट्रोल केले जात आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. त्यांनी या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी एका ट्रोलर्सच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : “माझे वडील…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

सध्या मालिकेत आलेल्या ट्वीस्टमुळे प्रेक्षक अनिरुद्ध या पात्राचा प्रचंड द्वेष करत आहेत. नुकतंच मिलिंद गवळी यांच्या पोस्टखाली एका महिलेने कमेंट केली आहे. ‘अजून किती खालच्या पातळीला जाऊन दृष्टपणाचा कळस गाठणार आहात. लाज वाटते’, अशी कमेंट त्या महिलेने केली आहे.

मिलिंद गवळींची कमेंट

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

त्यावर मिलिंद गवळींनी शांततेत उत्तर दिले आहे. “नमिताला माहिती असणार”, असे मिलिंद गवळींनी यावर उत्तर देताना म्हटले आहे. तर एका व्यक्तीने “मिलिंद गवळी हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले आहेत. ती मालिका आहे”, असे कमेंट करत म्हटले आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.