अभिनेत्री पवित्रा पुनिया व अभिनेता एजाज खान यांचे वर्षभरापूर्वी ब्रेकअप झाले आहे. २०२० मध्ये ‘बिग बॉस १४’ पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पवित्राने ब्रेकअपचं कारण सांगितलं. यावेळी तिने धर्मांतराबाबत भाष्य केलं होतं, त्यावरून एजाजने तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा लोक करू लागले. मात्र आता एजाजने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टेली मसाला’ला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा म्हणाली, “मी इथे हिंदू-मुस्लीम वादविवाद करत नाही, पण कोणत्याही व्यक्तीने आपल्या धर्माशी एकनिष्ठ असले पाहिजे. मला वाटतं की मुस्लीम मुलीने हिंदू घरात जरी लग्न केले तरी हिंदूंनी तिला धर्मांतर करायचा भाग पाडू नये. तसेच मुस्लिमांनीही असं करू नये.”

हेही वाचा – Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन

एजाजबरोबरच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या होत्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. त्यामुळे ब्रेकअप केल्याचं पवित्राने सांगितलं. पवित्राच्या मुलाखतीनंतर एजाजने धर्मांतर करण्यास दबाव टाकण्याचे आरोप झाले. आता एजाजच्या टीमने यावर उत्तर देत त्यांच्या नात्यात धर्म हा कधीच महत्त्वाच मुद्दा नव्हता, असं स्पष्ट केलं.

हेही वाचा – Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

एजाज व पवित्रा २०२० पासून डेट करत होते. (फोटो – इन्स्टाग्राम)

एजाजच्या टीमने दिलं उत्तर

एजाजच्या प्रवक्त्याने धर्मांतराच्या आरोपांबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड मैत्रीण पवित्रा पुनियाने केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “एजाज खान अशा कुटुंबातून आलाय जिथे सर्व धर्माचा आदर केला जातो. दोघांच्या नात्यात धर्म हा कधीच महत्त्वाचा मुद्दा नव्हता. अभिनेत्याने तीन दशकांहून अधिक या इंडस्ट्रीत काम केलं आहे. तो सर्व धर्माचे सर्व सण साजरे करतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही तुम्हाला पोस्ट पाहायला मिळतील. त्यामुळे अशा दाव्यांचा फक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरच परिणाम होत नाही तर त्यांना प्रोफेशन लाइफवरही होतो.”

हेही वाचा – “करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

एजाज खानच्या प्रवक्त्याने सांगितलं की अभिनेत्याच्या वडिलांना बरेच फोन येत आहेत. एजाजने पवित्रावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला की नाही याची चौकशी लोकांकडून होत आहेत. याबद्दल एजाजच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. एजाज व पवित्राच्या नात्याबद्दल ते आनंदी होते, मात्र आता त्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. दोघेही नात्यात असताना धर्म हा मुद्दा नव्हता; मात्र ब्रेकअपनंतर या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत, असंही प्रवक्त्याने नमूद केलं.

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

पवित्राने स्पष्ट केलंय की ती व एजाज धर्मामुळे वेगळे झाले नाहीत, असं प्रवक्त्याने सांगितलं. तसेच एजाज त्याचा चित्रपट किंवा वेब सीरिज येणार असतील तर तिरुपती बालाजी आणि सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वाद व दर्शनाला जातो, असंही प्रवक्त्याने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor eijaz khan reacts on religion breakup controversy with pavitra punia hrc