Nitesh Pandey Death: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे ५१व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितेश पांडे यांच्या निधनाने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना धक्का बसला आहे. मृणाल कुलकर्णींनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृणाल कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन नितेश पांडे यांचा फोटो शेअर केला आहे. “हे बरोबर नाही…नितेश पांडे आता आपल्यात नाहीत,” असं म्हणत मृणाल कुलकर्णींनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीला शूटिंगसाठी गेले होते. मंगळवारी(२३ मे) रात्री कार्डिअ‍ॅक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला. नितेश यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nitesh pandey died due to cardiac arrest marathi actress mrunal kulkarni shared emotional post kak